अर्थ : सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ.
उदाहरणे :
आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला होता.
उन्हाळ्यात दिनमान 16 ते 18 तासंचे असल्याने तपमान वाढते.
समानार्थी : दिनमान
अर्थ : विशिष्ट कालावधी.
उदाहरणे :
शाळेच्या दिवसात आम्ही नदीवर पोहायला जात होतो
अर्थ : विशिष्ट ठिकाणासंदर्भात एका सूर्योदयापासून दुसर्या सूर्योदयापर्यंतच्या कालावधी.
उदाहरणे :
कालचा दिवस खूप चांगला गेला
अर्थ : एखाद्या ग्रहाला आपल्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी.
उदाहरणे :
गुरूवरील दिवस पृथ्वीवरील दिवसापेक्षा मोठा असतो.
अर्थ : दिवसाच्या चोवीस तासातून काम करण्याची वेळ.
उदाहरणे :
माझा दिवस सकाळी चारलाच सुरू होतो.
अर्थ : सद्दीचा काळ.
उदाहरणे :
त्याचे दिवस फिरले.
दिवस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. divas samanarthi shabd in Marathi.